Smt. Princiya Sydny Hendricks

मी प्रिन्सिया सिडनी हेंड्रिक्स राहणार: उत्तन (मीरा- भाईंदर) मी ‘’ नारी सशक्तीकरण फौंडेशन ‘’ ची डायरेक्टर आहे. माझा जन्म १९८७ मध्ये उत्तन येथे झाला आणि माझे लग्न उत्तन मध्येस झाले आहे. मी संत जोसेफ शाळा उत्तन येथे १२ वी पर्यत शिक्षण घेतले आहे. मला एक ७ वर्षाची मुलगी आहे ती नाझरेथ स्कूल मध्ये शिकत आहे. माझा नवरा चष्मा कंपनी मध्ये काम करत आहे. माझी सासू आणि सासरे दोघेही म्हातारे आहेत. माझे आई बाबा मासेमारीचा व्यवसाय करतात मला दोन भाऊ आहेत एक भाऊ मासेमारी करतो आणि दुसरा भाऊ बाहेरगावी माझ्या मावशीकडे असतो. मी लग्नाच्या अगोदर युवक सघटना आणि गायनमंडल मध्ये कार्य करत होती आता लग्न झाल्यानंतर मी शिरे आल्दीया गावपरीवाराच्या पंच समिती मध्ये गेली ७ वर्ष कार्य करत आहे. २०१६ ते २०१८ पर्यंत मी पॅरिस कौन्सिलर म्हणून कार्य केले आहे.

मी लग्नाच्या अगोदर साई कन्सलटन्सी आणि नगरसेविका विजया वैती हाड्केश – मिरारोड येथे ७ वर्ष कॉम्पुटर ओपरेटर म्हणून काम केले होते. आणि २०१६ ते जून २०२० पर्यंत मी अग्रवाल हॉस्पिटल भाईंदर येथे रिशेपशनस्ट म्हणून काम करत होती. आता सध्या मी मिठालाल अंड भरत एडूकेशन अंड कलाकार ट्रस्ट मध्ये (Education Executive) म्हणून काम करत आहे.

मी ‘’ नारी सशक्तीकरण फौडेशन’’ मध्ये येण्या मागचे कारण माझे आईडल श्री. राजन वासू नायर यांनी माझ्या मनामध्ये आपल्या समाजातील महिलांसाठी काहीतरी करून त्यांच्या ज्याकाही समस्या आहेत त्या पुढे घेऊन येणे आणि आपल्या समाजातील महिलांमध्ये एक जागरूकता निर्माण करावी म्हणून मला प्रोत्साहन केले. तसेच मी सपूर्ण जगभरातील ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधित्व करावे म्हणून त्यांनी माझी निवड केली.

नारी सशक्तिकरण फाउंडेशन

हमसे जुड़ें